मायक्रोसॉफ्टच्या पावरपॉइंट, एक्सेल वा वर्ड हे कमी वेळात चांगले ग्राफिक्स, चित्रे, लोगो तयार करायला खुप फायदेशीर आहे.
आज यातील टेक्स्ट Format मधील Text Effect ऑप्शन थोडक्यात नजर टाकूयात.
- टेक्स्ट बॉक्स insert करा. त्यात शाळेचे नाव लिहा.
- त्याचे सिलेक्शन कायम ठेवत Format मेनूत जा.
- WordArt Styles ग्रुपमधून → Text Effect निवडा.
- आता माऊस Pointer → Transform वर न्या. उजवीकडे एक बॉक्स अवतरेल. त्यामध्ये विविध प्रकार दिसतील.
- अर्धवर्तुळ :
Wrap → Arch Up वर क्लिक करा.
Format मेनुतूनच उजवीकडील साईज Width व Height समान करा. (5).
आवश्यकता वाटल्यास फॉन्ट साईज / फॉन्ट बदला.
छोटा गुलाबी बॉक्सने अक्षर व आकार अर्धवर्तुळ होईपर्यत Adjustment करा.
- गावाचे नाव खालच्या ओळीत घेण्यासाठी :
Format → Text Effect → Transform → Button वर जा.
होम मेनुतून टेक्स्ट alignment center करा.
शाळेच्या नावाआधी इंटर अथवा शिफ्ट इंटर करा.
आकर्षक स्मार्ट आर्ट तयार कशी करावीत त्यासाठी हे एकदा वाचाच.
0 comments:
Post a Comment