USB = Universal Serial Bus
आज अनेक डिव्हाईस आहेत जी USB पोर्टद्वारे संगणकाला जोडली जातात.
स्पीड :
USB |
Long form |
स्पीड |
स्पीड स्पष्टीकरण |
---|---|---|---|
USB 2.0 |
Hi Speed |
480 Mbit/s |
Mega Bits Per Second |
USB 3.0 |
Super Speed |
4.80 Gbit/s |
Gigabits Per Second |
USB 3.1 |
Super Speed+ |
10 Gbit /s |
Gigabits Per Second |
म्हणजे 2.0 पेक्षा 3.0 चे स्पीड दहा पटीने अधिक आहे.
प्रत्यक्ष आपणास एवढे स्पीड मिळत नाही. याला अनेक कारणे असू शकतात.
- USB पोर्ट ज्या वायरने जोडले त्या वायरचे डाटा वाहून नेण्याची क्षमता.
- तुमचा पेनड्राईव्हची डाटा Read-Write करण्याची क्षमता / स्पीड.
- तुमचा पेन अथवा पोर्टेबल ड्राईव्ह 3.0 सपोर्ट करत नसेल.
- पेनड्राईव्ह ३.० असूनसुद्धा त्यातील Flash मेमरी कमी प्रतीची असणे.
प्रत्यक्षात 2.0 हे Writeसाठी 4 ते 9.5 MB/s तर 3.0 हे 11 ते 285 MB/s एवढे स्पीड देऊ शकते. माझ्याकडील पोर्टेबल हार्ड डिस्क जी दोन USB2.0 असून तिला दोन युएसबी केबल आहेत ती 12 ते 24 MB/s स्पीड देते.
USB 3.0 कसे ओळखावे?
- USB 3.0 च्या आतील भाग निळा असतो. {ही ओळख पक्की आहे असे नाही}
- USB 3.0 च्या युएसबी चिन्हाअगोदर SS असे लिहलेले असते व USB 2.0 पोर्ट असेल त्या ठिकाणी फक्त युएसबीचेच चिन्ह असते.
- USB 3.0 पोर्टमधे डोकावून पहिले तर पाच धातूच्या पट्ट्या दिसतील. 2.0 मधे मात्र चारच धातूच्या पट्ट्या दिसतील.
- तुमची पोर्टेबल हार्ड डिस्क जर USB 3.0 जोडली असेल तर Windows Explorer मधील खालच्या बारवर Connected to USB 3.0 असे दिसेल.
- Device Manager मधून USB Controllers मधे पाहणे
अधिक स्पीड मिळण्यासाठी काय करावे?
- आपल्याकडे USB 3.0 पोर्ट असेल तर त्यास सपोर्ट करणारे पेनड्राईव्ह व पोर्टेबल हार्ड डिस्क घ्याव्यात.
- अधिक Data Write करावयाचा झाल्यास USB 3.0 पोर्टचा अथवा पीसीच्या मागील भागातील USB पोर्टचा वापर करावा.
- पीसीला जर USB1.0, USB1.2, USB2.0 अशी पोर्ट असतील तर ती शोधून त्यातील Hi-Speed Port {2.0} चा वापर करावा.
- स्वस्तातील पेनड्राईव्हच्या आतील Flash Memory चे स्पीड क्लास कमी असू शकतात मग असे ड्राईव्ह वेगात काम करत नाहीत.
0 comments:
Post a Comment