WHAT'S NEW?
Loading...

कॉम्पुटरवर Copy केलेले TEXT मोबाईलवर कसे Paste कराल?



मोबाईल एक उत्तम पोर्टेबल डिव्हाईस आहे. त्यावर टाइपिंग करताना मर्यादा येतात.
कॉम्पुटरवर टाईप केलेले टेक्स्ट कंटेंट जर कॉम्पुटर वर कॉपी केल्या केल्या मोबाईलवर पेस्ट करता आला तर...? किती सोपे काम होईल ना?

अगदी सोपे आहे ते! चला तर मग लगेच सुरुवात करूया...

आवश्यक सॉफ्टवेअर :
  • मोबाईलसाठी Airdroid
  • पीसीसाठी फक्त कोणताही Browser

जोडणी:
प्रथम मोबाईल व कॉम्पुटर एकमेकास या सॉफ्टवेअरच्या मदतीने जोडून घ्या. जोडणी माहित नसल्यास Airdroid च्या मदतीने मोबाईल पीसीला कसा कनेक्ट करावा ते वाचावे.



पद्धत:
  1. Notepad / MS Word अथवा इतर कोणत्याही एडिटरमधून टेक्स्ट कॉपी करून घ्या.
  2. जोडणी पूर्ण झाल्यावर तुमच्या ब्राउझरवर उजवीकडे ToolBox आहे तेथील Clipboard निवडा.
  3. त्याखाली दिसत असलेल्या काळ्या बॉक्समध्ये राईट क्लिक करून तेथे पेस्ट करा.
  4. तेथेच उजवीकडे निळे बटन दिसते तेथे क्लिक करा.
  5. क्षणात Saved to device clipboard असा मेसेज दिसेल.
  6. आता सर्व कंटेंट तुमच्या मोबाईलच्या क्लीपबोर्डमध्ये आला आहे. तो कोणत्याही मेसेंजरमध्ये(अथवा इतर ठिकाणी) जाऊन पेस्ट करा.
खूप सोपे आहे ना? चला तर लगेच करून पहा.

मोबाईलमधील कोणताही भाग किंवा WhatsApp वरील मेसेज कॉपी करून तो
सरळ कॉम्पुटर मध्ये कसा पेस्ट करावा
यासाठी ही पोस्ट जरूर वाचा.

Enjoyed this post..! आणखी मदत करण्यास आनंद वाटेल. प्रतिक्रिया जरूर दया. धन्यवाद..!

4 comments: Leave Your Comments

  1. Replies
    1. Thanks Navnath Sir. Do Visit Regularly..

      Delete
  2. अधिक माहितीसाठी 'वाचावे' च्या लिंक दुरुस्ती केलेली आहे. कृपया अशा काही तांत्रिक त्रुटी असतील तर रिप्लाय द्यावा ही विनंती...

    ReplyDelete