WHAT'S NEW?
Loading...

पावरपॉइंट : नजरवेधक थ्री डी बटण सोप्या पद्धतीने..


पावरपॉइंट मधून आपणास आकर्षक थ्री डी ग्राफिक्स कमी वेळात व सोप्या पद्धतीने तयार करता येतात. चल तर आज करून पाहूया नजरेला खिळवून ठेवणारे थ्री डी बटण. .




या चित्रात दिसणारी सर्व ग्राफिक्स पावरपॉइंट मध्ये तयार केली आहेत.
येथे येणारी माहिती लगेच लक्षात आली नाही तर कृपया याअगोदरची पोस्ट वाचावी.


  1. Insert → Block Arrows → Pentagon
  2. शेपवर राईट क्लिक करून Add Text करा.
    Format मेनुतून Width 7cm, Height 3cm करा.
    Font साईज 40 याप्रमाणे सेटिंग्ज करून घ्या. (वा त्या आकारास शोभेल असा..)
  3. Format → Shape Effects → Preset → Preset 10 निवडा.
    आता तुमचे ग्राफिक्स पारदर्शी ग्लाससारखे दिसेल. आता त्याचे मटेरियल बदलू. हे आवडल्यास त्याची कॉपी करून शेजारी ठेवा.)
  4. Format → Shape Effects → Preset → 3-D Options.. मध्ये जा. उजवीकडे Format Shape Window येईल. (किंवा राईट क्लिक Format Shape → Effects )
  5. Material → Warm Matte निवडा. (अथवा तुम्हाला आवडेल ते घ्या.)
  6. तुमचा शेप थ्रीडी झाला आहे. आता रंग बदलू  Format → Shape Fill मधून डार्क रंग निवडा.
  7. फॉन्टचा रंग पांढरा नसेल तर तो Format → Text Fill मधून निवडा.
    (Shape Fill / Text Fill फरक लक्षात घ्या.)
  8. तुमचे एक छानसे बटण तयार झाले. आता त्याची कॉपी करा. आणि Format → Arrange → Flip Horizontal करा.
  9. त्यातील अक्षरे बदला Back लिहा. रंग बदला (6)
थ्रीडी बटण तयार...!
सोपे आहे ना? कोणत्याही विशेष कौशल्याची गरज नाही.

कस्टम शेप आणि वर सांगितलेल्या पद्धतीने तयार केलेल्या सर्व इमेज पहिल्या चित्रात आहेत.

शेजारी दाखवलेली इमेज PowerPoint मधे बनवली आहे तेथील 'येथे लिहा' च्या जागेवर तुम्हाला तुमची माहिती लिहिता येईल.

हे तयार डिझाईन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

चित्राची बॅकग्राउंड कसे textured करावे आणि आणखी माहितीसह लवकरच...

Thank you...!

7 comments: Leave Your Comments

  1. सुंदर
    अतिशय सुंदर

    ReplyDelete
    Replies
    1. अनारसे सर धन्यवाद..!

      Delete
  2. अतिशय उपयुक्त, नाविन्यपूर्ण आहे. ब्लॉग च्या डिझाईन इतकेच त्याचे कन्टेंटही स्मार्ट व हटके आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सागरे सर धन्यवाद..! आपणाला कंटेंट आवडला खूप आनंद झाला..

      Delete
  3. सर, विंडोज 8.1 ला merge- union हे पर्याय नाही. कसे करावे?

    ReplyDelete
  4. सर नमस्कार
    सातवा वेतन आयोग वेतन निशिती एक्सेल मध्ये बनवा

    ReplyDelete