WHAT'S NEW?
Loading...

एक्सेल: वय काढणे संपूर्ण सूत्रे.

दोन तारखांमधील फरक दिवसात, वर्षात, महिन्यात काढण्यासाठी हे सूत्र वापरता येते.

सूत्र :
=DATEDIF(जन्मतारीख, टार्गेट दिनांक, “y”)

Argument स्पष्टीकरण
“d” फरक एकूण दिवसात
“m” फरक एकूण महिन्यात
“y” फरक वर्षात
“ym” वर्षे सोडून फरक महिन्यात
“md” वर्षे व महिने सोडून फरक फक्त दिवसात


दोन तारखांमधील फरक फक्त वर्षात काढण्यासाठी
=DATEDIF(A2,B2,"y")

हा फरक एकूण महिन्यात काढण्यासाठी
=DATEDIF(A2,B2,"m")

आणि एकूण दिवसांत काढण्यासाठी
=DATEDIF(A2,B2,"d")

हा फरक वर्षे व दिवस दुर्लक्षित करून – फक्त महिन्यात
=DATEDIF(A6,B6,"ym")

आणि वर्षे व महिने दुर्लक्षित करून – फक्त दिवसात
=DATEDIF(A6,B6,"md")

या सर्वांचे एकत्रीकरण असे करू शकतो.
वर्षे-महिने-दिवस
=CONCATENATE(DATEDIF(A9,B9,"y")," वर्षे, ", 
 DATEDIF(A9,B9,"ym")," महिने, ", DATEDIF(A9,B9,"md")," दिवस")

आणि वर्षे आणि महिन्यात हवे असेल तर..
=CONCATENATE(DATEDIF(A9,B9,"y")," वर्षे, ",
 DATEDIF(A9,B9,"ym")," महिने"

जर तुम्ही टार्गेट दिनांक एकाच ठिकाणी लिहली असेल आणि Drag करताना तो Referece बदलत असेल तर ती $ चिन्हाने Specific करा.
=DATEDIF(A2, $B$2,"y")
किंवा त्या सेलला Drag करण्यापूर्वी Rename करा.

दिनांकवरून महिन्याचे आणि वाराचे नाव मराठीत करण्याचे सूत्राबद्दलच्या माहिती येथून वाचा.

आपल्या एक्सेलमधील दिनांक जर 11/23/2015 अशी दिसत असेल आणि ती 23/11/2015 अशी हवी असेल तर ती ग्लोबली कशी बदलावी यासाठी वाचा.

धन्यवाद..!

ही एक्सेल फाईल येथून डाऊनलोड करा आणि अभ्यासा.
(File Size: 10.1KB, File Type: xlsx, Excel 2007 & Above or Mobile Office Apps, Created in Excel 2013)

आपला दिन शुभ असो.

4 comments: Leave Your Comments

  1. खूप छान माहिती देत आहात
    मला excel formula बद्दल अजून एक माहिती हवी आहे मिळू शकेल का

    ReplyDelete
    Replies
    1. सुनील सर, धन्यवाद..!
      आपणाला माहिती देण्यास आनंद होईल. आपला प्रश्न कोणता आहे? अथवा कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे?

      Delete
  2. sir ajun new education softwere chi link pathwa.

    ReplyDelete
  3. sir jar ekach cell madhe vay for ex. 9-12 ase yayla have tar formula kai

    ReplyDelete