तुमच्याकडे मुलांच्या पूर्ण नावांची यादी एका स्तंभात आहे आणि तुम्हाला ती यादी नाव, मधले नाव व आडनाव अशा तीन वेगळ्या कॉलममध्ये हवी असल्यास फक्त दोन स्टेप पार पाडा.
- नावांची यादी पेस्ट करा.
- नावाचे सिलेक्शन कायम ठेवा.
- Data मेनुतून Text to Columns वर क्लिक करा.
- एक डायलॉग बॉक्स अवतरेल. आता Next क्लिक करा.
- Delimiters मध्ये योग्य तो ऑप्शन निवडा. येथे Space निवडली.
- Finish ला चेकमार्क करा.
आहे ना सोप्पे..!
=CONCATENATE(A1," ",B1," ",C1)
किंवा
=A1 & " " & B1 & " " & C1
व्हिडीओ (मराठी) :
वरील भाग हा सूत्राच्या मदतीने होता. आता एक्सेल २०१३/१६ मधील एक व्हिडीओ पहा. यामध्ये Flash Fill या खूप चांगल्या टूलच्या मदतीने आपण वरील सर्व गोष्टी काही क्लिकमध्ये करू शकाल आणि capitalization किंवा नावाचे संक्षिप्तीकीकरण सहज करता येईल.
या प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या कॉलम मध्ये असणारी नावे एकत्र करू शकता.
एक्सेलबद्दल इतर माहितीही येथे आहे ती पहिली नसल्यास पहावी.
धन्यवाद..! आपला दिन शुभ असो.
thanks
ReplyDeleteनमस्कार सर, धन्यवाद. हातच्याची बेरीज शिकवण्याचा स्वाध्याय मुलांना सोडवायला देण्यासाठी दोन वेगवेगळ्या cell मध्ये काय formula वापरावा. मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteसुनील सर धन्यवाद..!
Deleteयासाठी RANDBETWEEN(लहान संख्या, मोठी संख्या) हे सूत्र वापरावे लागेल
जसे १० ते ५० मधील संख्या येण्यासाठी
=RANDBETWEEN(10,50)
दोन्ही सेलमध्ये वरील सूत्र वापरू शकता.
यामुळे दोन स्वैर संख्या तयार होतील.
मुलांची नावे दाखलखारीज रजिस्टरवरुन
ReplyDeleteटी .सी. तयार करावयाची आहे .
टॅब१ वर
पूर्ण डिटेल्स व
टॅब २ वर
आपोआप टी .सी तयार झाली पाहिजे .
प्लीज मार्गदर्शन करा
Avinash sir..
ReplyDeleteबुधवारी सविस्तर माहिती लिहण्याचा प्रयत्न करतो आपण 3-4 दिवसात व्हिजिट द्यावी..
एक्सेल पूर्ण नाव वेगळे करणे व या उलट सूत्र टाकून एकत्र करणे .
ReplyDeleteहोत नाही .
प्लीज एक्सेल शीट द्या
डाऊनलोड करता येईल
नमस्ते अविनाश सर, काही कारणामुळे लिंक पोस्ट करण्यास वेळ लागला.
Deleteफाईल डाऊनलोड करून पहा.