WHAT'S NEW?
Loading...
Showing posts with label Formula. Show all posts
Showing posts with label Formula. Show all posts
एक्सेलमध्ये मराठीत वाराचे नाव आणि महिन्याचे नाव सूत्राच्या सहाय्याने येण्यासाठी दोन तीन सूत्रांची मांडणी एकत्र करावी लागते.
  1. A स्तंभात अ. नं. लिहले.
  2. B स्तंभात दिनांक लिहले.
  3. C स्तंभात डावीकडील दिनांकाचा वार मराठीत येण्यासाठी पुढीलप्रमाणे सूत्र लिहा.
    =INDEX({"सोमवार","मंगळवार","बुधवार","गुरुवार","शुक्रवार","शनिवार","रविवार"},WEEKDAY(B2,2))
  4. वारांची नावे जर रविवारपासून लिहली तर सूत्रात थोडा बदल होईल..
    =INDEX({"रविवार","सोमवार","मंगळवार","बुधवार","गुरुवार","शुक्रवार","शनिवार"},WEEKDAY(B2))
  5. D स्तंभात दिनांकाचा महिना मराठीत येण्यासाठी..
    =INDEX({"जानेवारी","फेब्रुवारी","मार्च","एप्रिल","मे","जून","जुलै","ऑगस्ट","सप्टेंबर","ऑक्टोबर",
    "नोव्हेंबर","डिसेंबर"},MONTH(B2))
  6. आता तुम्ही B2 सेलमधील दिनांक बदलली तर वार व महिन्याचे मराठीतील नाव बदलेल.
  7. E स्तंभात आणखी विस्तारित पूर्ण मराठीत दिनांक लिहला आहे.
    =CONCATENATE(DAY(B2),"  ",INDEX({"जानेवारी","फेब्रुवारी","मार्च","एप्रिल","मे","जून",
    "जुलै","ऑगस्ट","सप्टेंबर","ऑक्टोबर","नोव्हेंबर","डिसेंबर"},MONTH(B2))," ",YEAR(B2)) 
ही एक्सेल फाईल डाऊनलोड करून पहा. (File Size : 12 KB, Type: xlsx, Excel 2007 & above, Created in Excel 2013)
धन्यवाद...!
आणखी काही माहिती हवी असल्यास कमेंट लिहा.
तुमचा दिवस शुभ असो..